Special Report | आधी मुख्यमंत्र्यांचे मेहुणे, नंतर सरनाईक आता राऊत -Tv9
आता गोरेगावातील पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगवरुन संजय राऊतांवर कारवाई झालीय. राऊतांची पत्नी वर्षा संजय राऊतांचे अलिबागच्या किहीम गावातील प्लॉट आणि दादरमधला फ्लॅट जप्त झालाय.
ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाचे काम, काळ्या पैशांची अफरातफर अर्थात मनी लाँड्रिंगच्या विरोधात कारवाया करणं हे आहे, सध्या याच ईडीच्या निशाण्यावर शिवसेनेचे नेते आलेत. गेल्या 15 दिवसांत शिवसेनेच्या तिघांवर कारवाई करण्यात आलीय. 23 मार्चला मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर संपत्ती जप्तीची कारवाई झाली आहे. 25 मार्च ईडीच्या मोर्चा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांकडे वळला आणि 5 एप्रिलला संजय राऊतांवर कारवाई झाली. 15 दिवसांत शिवसेनेचे तिघे कसे ईडीच्या फेऱ्यात आलेत, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीनं कारवाई केली. पाटणकरांचे ठाण्यातील 11 फ्लॅटसह 6 कोटी 45 लाखांच्या संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांवर NSEL घोटाळा प्रकरणात कारवाई झालीय. ठाण्यातील 2 फ्लॅट ईडीनं जप्त केलेत, त्यात हिरानंदानी इस्टेटमधील राहत्या घराचाही समावेश आहे
आणि मीरारोड येथील 250 मीटरची जमीन, अशी एकूण 11 कोटी 35 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आलीय आणि आता गोरेगावातील पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगवरुन संजय राऊतांवर कारवाई झालीय. राऊतांची पत्नी वर्षा संजय राऊतांचे अलिबागच्या किहीम गावातील प्लॉट आणि दादरमधला फ्लॅट जप्त झालाय.