देशात समान नागरी कायदा लागू होणार? मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टच म्हटलं…
VIDEO | नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी बोलताना रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना खडसावलं, म्हणाले...
जालना : देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. देशात समान नागरी कायदा अद्याप लागू झालेला नाही. जेव्हा कधी अशाप्रकारे मसुदा तयार करण्यात येईल आणि तो जनतेसमोर ठेवण्यात येईल, तेव्हाच त्यावर भाष्य करता येईल, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या संसदेचं उद्घाटन झाले. मात्र, विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. यावर रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन संसदेचे आज उद्घाटन असून विरोधकांनी त्याचा मान राखला पाहिजे, उगाच विरोध करू नये असे देखील दानवे म्हणालेत. संसद भवन हे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहाचा मान, शान सर्वांना राखला पाहिजे. अशा प्रकारचं संसद सभागृह व्हावं ही जनतेची इच्छा होती, यापूर्वीदेखील काँग्रेसने अशी शंका उपस्थित केली होती. उगाच काहीतरी विरोध दर्शवत जनतेत चर्चा निर्माण करायची हे विरोधकांनी करू नये, असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना केले आहे.