Breaking | ईद-ए-मिलादसाठी नवी नियमावली जाहीर, मिरवणूक काढण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक

Breaking | ईद-ए-मिलादसाठी नवी नियमावली जाहीर, मिरवणूक काढण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक

| Updated on: Oct 18, 2021 | 5:41 PM

राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये फक्त 5 लोक चढू शकतात. अशा प्रकारे 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने केवळ 25 लोकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जेव्हा राज्यात शाळा, महाविद्यालये आणि मॉल उघडले जातात, राजकीय पक्ष मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, तेव्हा ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या जुलूसमध्ये फक्त 5 वाहने आणि 25 लोकांना परवानगी देणे अयोग्य आहे. हे दर्शवते की सरकार त्यांच्या समाजासोबत पक्षपात करत आहे.

रजा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी म्हणाले की, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये फक्त 5 लोक चढू शकतात. अशा प्रकारे 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने 10 ट्रक आणि 150 लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती