एकनाथ खडसे यांनी स्पष्ट सांगितले, मुक्ताईनगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे

एकनाथ खडसे यांनी स्पष्ट सांगितले, मुक्ताईनगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे

| Updated on: Feb 13, 2023 | 10:39 PM

VIDEO | मुक्ताईनगर मतदारसंघात दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू, आमदार एकनाथराव खडसे यांचा आरोप

जळगाव : मुक्ताईनगर मतदारसंघात दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत वारंवार एसपीना कल्पना दिली आहे. मात्र जळगाव जिल्ह्याची कायदाची व्यवस्था बिघडली असल्याचेही खडसे यांनी सांगितले. मुक्ताईनगर मतदारसंघात लोकप्रतिनिधीच्या त्रासामुळे कुणीही अधिकारी येण्यास तयार नाही. यातच मुक्ताईनगर-बोदवडसह संपूर्ण मतदारसंघात दोन नंबरचे अवैध धंदे गुटखा विमल अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला. पहा या संदर्भात नेमके काय म्हणालेत एकनाथ खडसे?

Published on: Feb 13, 2023 10:39 PM