Raksha Khadse यांचा रावेर लोकसभेच्या जागेवर मोठा दावा; म्हणाल्या, 'जर भाजपनं संधी दिली तर...'

Raksha Khadse यांचा रावेर लोकसभेच्या जागेवर मोठा दावा; म्हणाल्या, ‘जर भाजपनं संधी दिली तर…’

| Updated on: Sep 13, 2023 | 4:58 PM

VIDEO | एकनाथ खडसे राष्ट्रवादी गेले त्यानंतर त्यांच्या सून रक्षा खडसे यादेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार? महाराष्ट्रातील चर्चेवर काय म्हणाल्या भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे ?

जळगाव, १३ सप्टेंबर २०२३ | ‘रावेर लोकसभेचा इतिहास जर पाहिला तर सतत्याने या ठिकाणी भाजपचाचं विजय होत आहे. भविष्यातही ही जागा भाजप जिंकणार’, भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभेच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. तर रावेर लोकसभेच्या जागेसाठी पक्षाने मला संधी दिली तर त्याचं सोनं करेलं, असा विश्वासही रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यातील जनता संभ्रमात आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले, त्यामुळे मी ही राष्ट्रवादीत जाईल अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र मी राष्ट्रवादीत जाणार नाही तर भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करते आणि शेवटपर्यंत ते काम करत राहील, असा शब्दही रक्षा खडसे यांनी दिला आहे.

Published on: Sep 13, 2023 04:58 PM