विरोधक मनात मांडे खात आहेत, एकनाथ खडसे यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

विरोधक मनात मांडे खात आहेत, एकनाथ खडसे यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

| Updated on: Feb 13, 2022 | 11:33 PM

महाविकास आघाडी सरकार 10 मार्चनंतर कोसळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पाटील यांच्या या दाव्यावर आता महाविकास आघाडीचे नेते जोरदार टीका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही चंद्रकांत पाटलांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.

महाविकास आघाडी सरकार 10 मार्चनंतर कोसळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पाटील यांच्या या दाव्यावर आता महाविकास आघाडीचे नेते जोरदार टीका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही चंद्रकांत पाटलांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ‘चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत, अशी टीका खडसे यांनी केलीय.

‘बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला आणि दुर्दैवानं सरकार पडलंच तर बहुमताच्या जोरावर पुन्हा हेच सरकार येणार. सरकार पाडण्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोवर हे सरकार पडणार नाही’, असा दावाही खडसेंनी केलाय.