एकनाथ खडसे पक्षांतर करणार? भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर नाथाभाऊ काय म्हणाले?
पक्षांतर करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचे म्हणत तुर्तास असा निर्णय मी घेणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. एकनाथ खडसे पुढे असेही म्हणाले, असा काही निर्णय एका दिवसात एका क्षणात....
एकनाथ खडसे दिल्लीत गेल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांना वेग आला होता. मात्र एकनाथ खडसे दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षांतर करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचे म्हणत तुर्तास असा निर्णय मी घेणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. एकनाथ खडसे पुढे असेही म्हणाले, असा काही निर्णय एका दिवसात एका क्षणात किंवा दिवसात होत नसतो. त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकार्यांना विश्वासात घेऊनच असे निर्णय होत असतात. ज्या पक्षाने आपल्याला मदत केली तर पक्षाला विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यामुळे अशी कुठलीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो. जेव्हा काही अशासंदर्भात विषय येईल तेव्हा मी स्वतःहून सांगेल असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.