Vidhan Parishad Election 2022 : एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल

Vidhan Parishad Election 2022 : एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल

| Updated on: Jun 09, 2022 | 12:17 PM

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी दिल्यानं त्यांचं राजकीय पुनर्वसन झाल्याचं बोललं जातंय.   

मुंबईः  राज्यात सध्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकींचे वारे वाहतायेत. राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडत असताना विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेलाही वेग आला आहे.  राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यावर शिक्कमोर्तब झालंय. आज दोन्ही ज्येष्ठ नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी काल अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात. दरम्यान, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी दिल्यानं त्यांचं राजकीय पुनर्वसन झाल्याचं बोललं जातंय.

 

Published on: Jun 09, 2022 12:16 PM