मिळालेल्या संधीचं सोनं करेन- एकनाथ खडसे

मिळालेल्या संधीचं सोनं करेन- एकनाथ खडसे

| Updated on: Jun 09, 2022 | 2:34 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला. भाजपनं ज्या परिस्थितीत मला ढकललं, त्यावेळी राष्ट्रवादीनं मला आधार दिला, अशी प्रतिक्रिया खडसेंनी यावेळी दिली.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला. भाजपनं ज्या परिस्थितीत मला ढकललं, त्यावेळी राष्ट्रवादीनं मला आधार दिला, अशी प्रतिक्रिया खडसेंनी यावेळी दिली. एकनाथ खडसे इतिहासजमा झाले असं लोक म्हणत असताना शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याचं त्यांनी म्हटलं. मिळालेल्या संधीचं सोनं करेन, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंबाबतही प्रतिक्रिया दिली. पंकजावर अन्याय होत असल्याचं खडसे म्हणाले. राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नाथाभाऊंना गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा होती. विधानपरिषद उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली तर ही त्यांच्यासाठी मोठी संधी समजली जात आहे.

Published on: Jun 09, 2022 02:34 PM