भाजप आणि शिंदे गट यांची अलिखीत छुपी युती, पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा निर्णय- एकनाथ खडसे

भाजप आणि शिंदे गट यांची अलिखीत छुपी युती, पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा निर्णय- एकनाथ खडसे

| Updated on: Jun 30, 2022 | 11:15 AM

शिवसेना हा गटारातल्या बेडकरसारखा पक्ष आहे असंही गिरीश महाजन म्हटले होते पण तरीही गुलाबरावांनी काहीही प्रत्युत्तर दिलं नाही.

मुक्ताईनगर: काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सगळी राजकीय गणितं बदलली. बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. आमदार जेव्हापासून गुवाहाटीला गेले आहेत तेव्हा पासून सगळ्याच बाजूंनी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातायत. दरम्यान शिंदे आणि भाजपात यांच्यात अलिखित छुपी युती होती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलंय. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केले त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा होता.आज पर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली नाही असंही एकनाथ खडसे म्हणालेत. जळगावात गुलाबराव पाटलांवर कधीही गिरीश महाजनांनी टीका केली नाही. शिवसेना हा गटारातल्या बेडकरसारखा पक्ष आहे असंही गिरीश महाजन म्हटले होते पण तरीही गुलाबरावांनी काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. याच्यावरून लक्षात येतं कि भाजपबरोबर जायचा विचार एकनाथ शिंदेचा आजचा विचार नव्हता तो फार आधीपासूनच विचार होता असं एकनाथ खडसे म्हणालेत.

 

Published on: Jun 30, 2022 11:14 AM