Eknath Khadse : जळगावमध्ये एकनाथ खडसे समर्थकाला महिलांकडून मारहाण, खडसेंकडून रुग्णालयात जात विचारपूस
रोहिणी खडसे यांचा पोलिसांसोबत वाद झाला आणि हे प्रकरण आणखी वाढत गेलं आहे. या प्रकरणात दोन्ही बाजुने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी रुग्णालयात जात आपल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली.
सध्या जळगावमध्ये चर्चा रंगलीय ती रस्त्यावर झालेल्या तुफान मारहाणीची आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बाचाबाचीची. एकनाथ खडसे समर्थकाला रस्त्यावरच महिलांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीविरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात ठिय्या आंदोलन सुरू केलं. रोहिणी खडसे यांचा पोलिसांसोबत वाद झाला आणि हे प्रकरण आणखी वाढत गेलं आहे. या प्रकरणात दोन्ही बाजुने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी रुग्णालयात जात आपल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली.
Published on: Jul 22, 2022 10:45 PM
Latest Videos