पवार यांच्यावर केलेल्या ‘त्या वक्तव्यावरून’ निलेश राणे यांच्यावर कोणाची टीका? म्हणाला, ‘कहाँ राजा भोज, कहाँ’
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार असं म्हणत निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
जळगाव : माजी खासदार, भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. त्यांनी “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असं म्हटलं होतं. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी निलेश राणे यांचा चांगलाच समाचार घेत जशाचतस उत्तर दिलं आहे. त्यांनी, ‘कहाँ राजा भोज, कहाँ’वगैरे बोलायला नको असं म्हणत राणे यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांच्यावर संस्कार वगैरे आहे की नाही? यांच्यावर आई-वडिलांनी संस्कार नीट केले पाहिजे असा सल्ला दिला आहे. ते राणे यांचे सुपूत्र असल्यानेच त्यांना सरकार अभय देत आहे. मात्र जर हेच जर दुसऱ्या कोणी बोललं असतं तर आता जेलमध्ये असता असंही त्यांनी म्हटलं आहे.