दिल्ली दौऱ्यानंतर शिंदे अन् फडणवीसांमध्ये पहिल्यांदाच ‘वर्षा’वर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात ही चर्चा झाली. तर देवेंद्र फडणवीस यांच्या आधी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक...
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल वर्षा या निवासस्थानी अर्धा तास चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात ही चर्चा झाली. तर देवेंद्र फडणवीस यांच्या आधी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दाराआड साधारण ३० मिनिटं ही चर्चा झाली आहे. या चर्चेत खाते वाटप, शपथविधी सोहळा आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर गिरीश महाजनांनी सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’वर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. दिल्ली दौऱ्यानंतर शिंदे अन् फडणवीस यांच्यात पहिल्यांदाच ही चर्चा झाली. सध्या त्यांच्या या भेटीची चर्चा होतेय.