Special Report | कोर्टातल्या सुनावणीमुळं मंत्रिमंडळ विस्तार लांबला?

Special Report | कोर्टातल्या सुनावणीमुळं मंत्रिमंडळ विस्तार लांबला?

| Updated on: Aug 07, 2022 | 9:46 PM

सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी, 16 आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार, किंवा तज्ज्ञांच्या मते शिंदे गटाकडे उरलेला विलिनीकरणाचा एकमेव पर्याय. मंत्रिमडळ विस्तार न होण्यामागची हीच कारणं आहेत. यावरुनच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय.

मुंबई : लवकरच… मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या प्रश्नावर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडे सध्या हे एकच उत्तर आहे. आणि त्यांचं हे उत्तर आता राज्यातल्या जनतेच्याही तोंडपाठ झालंय. शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी होऊन जवळपास 40 दिवस उलटलेत.  पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही.

सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी, 16 आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार, किंवा तज्ज्ञांच्या मते शिंदे गटाकडे उरलेला विलिनीकरणाचा एकमेव पर्याय. मंत्रिमडळ विस्तार न होण्यामागची हीच कारणं आहेत. यावरुनच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय.

मंत्रिपदासाठी असलेली अंतर्गत स्पर्धा आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांची नाराजी यामुळंच मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे. अजित पवारांच्या याच वक्तव्याला दुजोरा देणारं वक्तव्य काल बच्चू कडूंनी केलंय. कारण कालपर्यंत मंत्रिमंडळ विस्तारावर भरभरुन बोलणारे बच्चू कडू काल काहीसे नाराज असल्याचं पाहायला मिळाले.

भाजपकडेही मंत्रिपदासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांची फळी आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये मंत्रिपदाचं वाटप कसं करायचं हाही प्रश्न आहे. अजितदादांनी राज्य़ सरकारला धारेवर धरल्यानंतर भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय.

30 जूनला शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी झाला होता. याला 40 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झालेली नाही. विरोधी पक्ष सध्या याच मुद्द्यावरुन सरकारला टार्गेट करतोय. पण सरकारकडे यावर कुठलंही ठोस उत्तर नाही.

Published on: Aug 07, 2022 09:45 PM