Special Report | राजकारणातल्या ‘बच्चन’ला कुणाची ऑफर? दादांचा भाजपला सॅाफ्ट कॅार्नर
VIDEO | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपमध्ये येण्यास कुणाची ऑफर, अजितदादांचा भाजपला सॅाफ्ट कॅार्नर, सेनेवर निशाणा?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर तुटून पडले आहेत. शिवसेनेच्या एका जाहिरातीमुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे यांच्या मंत्र्यांवर तुटून पडले. मात्र त्याच शिंदेंच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं अजित पवार यांना मोठी ऑफर दिल्याचे समोर आले आहे. जे अजित पवार सभा आणि पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्र्यांना धारेवर धरताय. त्याच सरकारमधील मंत्र्यानं अजित पवार यांना खुली ऑफर दिली. अजित पवार यांनीही आपल्यासोबत यावं असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी दिलंय. एका शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड केली. त्याच दरम्यान अजित पवार पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर निशाणा साधला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट.