‘गृहखात्या’नंतर आता ‘गृहनिर्माण’वरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी काय?
शिवसेना गृहखात्यावर अडून आहे. उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार आहेत. तर त्यांना गृहमंत्रिपद मिळावं असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गृहनिर्माण खात्याची मागणी केली.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्यावर आला आहे. मात्र अद्याप गृहखात्यावरून तिढा कायम आहे. शिवसेना गृहखात्यावर अडून आहे. उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार आहेत. तर त्यांना गृहमंत्रिपद मिळावं असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गृहनिर्माण खात्याची मागणी केली. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या बोलण्यातून एक बाब स्पष्ट झाली आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. गेल्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना गृहखातं हे त्यांच्याकडे होतं. तोच तर्क शिवसेना आता देतेय. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होत असल्यास गृहखातं त्यांना मिळावं, असं उघडपणे एकनाथ शिंदे सांगताय. भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाहीये, त्यामुळे गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार हे निश्चित झालं आहे. गृहखात्यावरून निर्माण झालेला पेच हा गृहनिर्माण खात्यापर्यंत आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, आता राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खात्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या सरकारमध्ये गृहनिर्माण खातं भाजपकडे होतं. त्यामुळे आता पुन्हा गृहनिर्माण खातं भाजप पुन्हा स्वतःकडेच ठेवणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट