Eknath Shinde Video : ‘आलटून-पालटून मुख्यमंत्री करू’, नाना पटोलेंच्या ऑफरवर एकनाथ शिंदे थेट म्हणाले, ‘ज्याला आवडेल…’
खुर्च्यांच्या अदलाबदलीसंदर्भात एकनाथ शिंदेंनी एक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं होतं. आता या विधानवरुन चर्चांना उधाण आलेले असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी होळीच्या निमित्ताने राज्याचे उमपुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. इतकंच नाहीतर आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हटले. यामुळे राजकीय वातावरण तापणार असून महायुतीकडून काय उत्तर मिळणार याकडे आता लक्ष लागून आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था फार वाईट असल्याचे म्हटले. मात्र नाना पटोले यांनी दिलेल्या या ऑफरवर उमपुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट प्रत्युत्तर देत त्यांची ऑफर धुडकावून लावल्याचे पाहायला मिळाले. ‘आमचा रंग भगवा आहे. ज्याला भगवा परवडेल, आवडेल त्यांनी आमच्याच सोबत यावं. भगवा रंग हा वैश्विक आहे. भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे. सनातन धर्माचा आहे. त्यामुळे हा भगवा रंग कोणाचाही द्वेष करणारा नाही. तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे. म्हणून ज्याला कोणाला वाटेल त्यांनी या भगव्या रंगात न्हाहून निघावं सोबत यावं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ‘, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे

'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार

संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय

जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
