Raigad : ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी तर अजितदादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्यातही ते सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शनिवारी रायगड किल्ल्यावर दाखल झाले होते. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. रायगडावरील शिवपुण्यतिथीनिमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची संधी देण्यात आली मात्र अजित पवार यांचं भाषणच झालं नसल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्यातील कार्यक्रमात आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाषणासाठी पुकारले. मात्र ते गेले नाही. यावेळी त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं नाव सुचवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे साहेब…शिंदे साहेब.. असं म्हणत एकनाथ शिंदे यांना वेळेवर भाषण करण्याची संधी दिली. मात्र अजित पवार यांचे नाव ही घेतले नाही आणि भाषणही झाले नसल्याचे दिसून आले. या सोहळ्यात मोजकीच भाषणे होती यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती. पण फडणवीसांनी शिंदेंना ऐनवेळी भाषणाची संधी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे

वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने

रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम

चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
