देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडतंय काय?; मंत्र्यांच्या शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...

देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडतंय काय?; मंत्र्यांच्या शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्…

| Updated on: Dec 14, 2024 | 3:26 PM

15 डिसेंबरला नागपूरच्या राजभवनात संध्याकाळी 4 वाजता मंत्री मंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दरम्यान, या मंत्र्यांच्या शपथविधीआधीच इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होतंय. त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे. 15 डिसेंबरला नागपूरच्या राजभवनात संध्याकाळी 4 वाजता मंत्री मंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दरम्यान, या मंत्र्यांच्या शपथविधीआधीच इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जात भेट घेतली आहे. तर शुक्रवारी रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली. मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सांगर बंगल्यावर दाखल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर सातारा येथील शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे गटाचे संजय शिरसाठ, माजी मंत्री संजय राठोड, आमदार कुमार आयलानी, मनसे नेते राजू पाटील, आमदार संतोष दानवे, आमदार नमिता मुंदडा यांनी धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Dec 14, 2024 03:26 PM