५० कोटींचा मामला अन् ठाकरे यांच्यावर निशाणा, ‘आम्हाला खोके म्हणता आणि…’, पक्षनिधीवर शिंदे विरूद्ध ठाकरे आमने सामने
VIDEO | 'आम्हाला खोके म्हणता आणि...', पक्षनिधीवर शिंदे विरूद्ध ठाकरे आमने सामने, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘५० खोके अशी आमच्यावर टीका करतात, आम्हाला खोके म्हणता आणि ५० कोटी पक्षनिधी मागण्यासाठी मला पत्र लिहितात.’ असा हल्लाबोल शिंदे यांनी केला. ते पत्र शिंदे यांनी थेट विधानसभेत दाखवलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे आणि ठाकरे गट यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ५० खोक्यांवर टीका करतात आणि ५० कोटीं पक्षनिधीसाठी मला पत्र लिहितात, असे म्हणत शिवसेना पक्ष निधीच्या पत्रावरून शिंदे यांनी हल्लाबोल केला. अधिवेशन काल संपलं पण शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे ऑन फायर, अशाच मूडमध्ये दिसले. बघा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Aug 05, 2023 07:38 AM
Latest Videos