‘आमचं लव्ह मॅरेज’, महायुतीच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
VIDEO | 'अजितदादा तुमची राष्ट्रवादीत काय दहशत, राष्ट्रवादीवाले तुम्हाला कोणीही गद्दार म्हणत नाही',असे म्हणत एकनाथ शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरे गटासह विरोधकांना खोचक टोला
मुंबई, १ सप्टेंबर, २०२३ | एकीकडे इंडिया आघाडीची कालपासून मुंबईत बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ताकदीने भाजपच्या विरोधात उभं राहण्यासाठी या बैठकीत चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीची बैठकही आज होत आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महायुतीनं जोरदार तयारी सुरू केली आहे. या बैठकीत बोलताना एकनाथ शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी ते म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजप आमचं आधी लव्ह मॅरेज झालं होतं. आता सरकारला तिसरं इंजिन जोडलं गेलंय. अजित दादा आमच्या सोबत आल्यामुळे गद्दार आणि खोके बंद झालेत. नाहीतर आम्ही घराबाहेर निघालो की, सगळे गद्दार खोके म्हणायचे पण अजित दादा तुमची राष्ट्रवादीमध्ये काय दहशत आहे. राष्ट्रवादीवाले तुम्हाला कोणीही गद्दार म्हणत नाही.’ यावेळी बोलत असताना त्यांनी इंडिया आघाडीवर देखील निशाणा साधला, आपल्याला जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, असं त्यांनी म्हटलंय.