बहिणीनेच बहिणींच्या बाबतीत असं बोलावं? सुप्रिया सुळेंच्या तोडीं शोभत नाही, शिंदेंच्या नेत्याचा खोचक टोला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ काल पुण्यातील बालेवाडी येथे झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुती सराकारला मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळाली. अशातच सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमासाठी महिलांनी हजेरी लावावी, अन्यथा त्यांचा लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म रद्द कऱण्यात येईल अशी धमकी दिली असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या आरोपांवर शिंदे गट शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी देखील सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ‘एका बहिणीनेच बहिणींच्या बाबतीत असं बोलावं हे सुप्रिया सुळे यांच्या तोंडी शोभत नाही. लोकसभेच्या सुसंस्कृत खासदार म्हणून आम्ही त्यांना मानतो. त्यांच्या तोंडून असे शब्द येणे हे चुकीचे आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी सुप्रिया सुळेंना खोचक टोला लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले, धमकी देऊन कोणी महिलांना आणेल, एवढी राज्यातली परिस्थिती सध्यातरी बिघडली नाही.
Published on: Aug 18, 2024 02:09 PM
Latest Videos