“… त्या कंडक्टरला लोळेस्तोवर मारेन”, विद्यार्थींनीच्या तक्रारीनंतर आमदार संतोष बांगर यांची धमकी
VIDEO | विद्यार्थ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यापुढं बस कंडक्टरचं गाऱ्हाणं मांडलं अन् बस आगारातील अधिकाऱ्याला बोलवून शिवीगाळ करत दिली धमकी, विद्यार्थ्यांच्य तक्रारीनंतर संतोष बांगर म्हणाले...
हिंगोली, १९ ऑगस्ट २०२३ | शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगर प्रमुखांना धमकी दिल्याचा संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. हिंगोलीमधील काही विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी एसटीच्या बस वाहकाची तक्रार संतोष बांगर यांच्याकडे केली. विद्यार्थींनीनी आपली तक्रार सांगितल्यानंतर संतापलेल्या संतोष बांगर यांनी तातडीने हिंगोलीच्या बस स्थानक प्रमुख अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि विद्यार्थ्यांना त्रास देणारा वाहक कोण आहे ते बघून त्या समजवा असे म्हणत विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या बस वाहकाला मारहाण करण्याची धमकी त्यांनी यावेळी दिली. संतोष बांगर म्हणाले, ‘तुमचा कंडक्टर म्हणतोय, तुम्ही पोरं असता तर तुम्हाला मारलं असतं, त्या मुली ज्या पद्धतीने सांगत आहेत ते ऐका. कंडक्टर म्हणतो तुमच्या बापाची बस आहे का? तुम्हाला सांगतो अशा कंडक्टरला मी पायाखाली तुडवेन, तुम्हाला माहिती आहे, मी जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे. मला काही कमी जास्त वाटलं तर मी त्या कंडक्टकरला लोळेस्तोवर मारेन हे ध्यानात ठेवा. या लेकरांची गैरसोय झाली नाय पाहिजे.’ असा इशारच त्यांनी दिला.