Saamana : ‘आखरी मंजिल तीच… महाराष्ट्राचे अल्लाबक्ष भाजपच्या प्रचारास निघाले’; सामनातून मुख्यमंत्र्यांवर घणाघात
भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच राज्यात जातायंत. देशातील पाच राज्यातील निवडणुकीवर सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर ही टोलेबाजी करण्यात आली आहे. अल्लाबक्ष आता प्रचारास निघाले अशा शिर्षकाखाली सामनाचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय.
मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | ठाण्यातील डुप्लिकेट शिवसेना आता भाजपसाठी प्रचारात उतरणार आहे, असे म्हणत सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच राज्यात जातायंत. देशातील पाच राज्यातील निवडणुकीवर सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर ही टोलेबाजी करण्यात आली आहे. अल्लाबक्ष आता प्रचारास निघाले अशा शिर्षकाखाली सामनाचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. ‘मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत व ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत. सत्य पायदळी तुडवून त्यांनी ‘खोटे’ छातीशी धरले आहे. शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतला भाजपच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत. नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले. महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचारास निघाले आहेत. त्यांची ‘आखरी मंजिल’ तीच आहे!’, असे म्हटले आहे.