Ekanth Shinde : राजकीय घडामोडांना वेग! एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता, राज्यपालांना पत्र देणार?

Ekanth Shinde : राजकीय घडामोडांना वेग! एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता, राज्यपालांना पत्र देणार?

| Updated on: Jun 28, 2022 | 9:46 AM

बंडखोर एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात येण्याची शक्यताय.

मुंबई : राज्यातील घडामोडींना वेग आलाय. पुढील 48 तासांत  बंडखोर शिंदे (Ekanth Shinde) हे मुंबईत येण्याची शक्यता आहे. राज्यपालांना शिंदे गटाकडून किंवा छोट्या पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता नेमकं काय घडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Political Crisis) वर्तुळाचं लक्ष लागलंय. तर चहुकडे हिच चर्चा आहे. बंडखोर एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पुढील सुनावणी ही 11 जुलैला पार पडणार आहे. त्यामुळे बंडखोरांना अभय मिळाय. दरम्यान, आज काय होतं, शिंदे मुंबईत येणार का, राज्यपालांना पत्र देणार का, याकडे लक्ष असणार आहे.

 

 

Published on: Jun 28, 2022 09:46 AM