Raigad Guardian Minister Video : रायगडच्या पालकमंत्रिपदावर तोडगा निघाला? भाजपच्या प्रयत्नानंतर अखेर वाद मिटणार?
रायगडचं पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद अखेर थांबणार असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गोगावले आणि तटकरे नेमकं काय भाष्य करणार?
रायगडचं पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईचे पालकमंत्रिपद हे भारतीय जनता पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आदिती तटकरे यांच्यातील पालकमंत्रिपदावरील वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर अखेर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. ज्यात रायगडचं पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. सुरूवातीला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या भरत गोगावलेंच्या नाराजी चर्चा सुरू झाल्या होत्या. भरत गोगावले यांच्या नाराजीनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. या स्थगितीनंतर भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना हा सुरूच असल्याचे पाहायला मिळत असून रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’

'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी

संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
