शिंदे गटातील आमदाराची ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ, ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय रायमुलकर यांची ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ, शिंदे गटाच्या आमदारांना नेमकं झालंय तरी काय? व्हायरल ऑडिओ क्लिपवर आता रायामुलकर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.
बुलढाणा, १२ ऑगस्ट २०२३ | येत्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मेहकर तालुक्यातील साब्रा येथील गजानन वानखेडे या ग्रामपंचायत सदस्याने मेहकरचे शिंदे यांच्या शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना कार्यक्रमाची पास मागण्यासाठी फोन केला होता. मात्र अनेकदा फोन केल्याने शिंदे गटाचे मेहकरचे आमदार संजय रायमुलकर हे चिडले आणि त्यांनी थेट या ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा एक कॉल रेकॉर्ड सध्या जिल्हाभरात व्हायरल होत आहे. यामुळे मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे. सत्ताधारी पक्षातील शिंदे गटाचे आमदार संजय रायामुलकर यांनी ही शिवीगाळ केली असून यावर आता रायामुलकर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वीही आमदार रायमुलकर यांचे काही लोकांना शिवीगाळ केल्याचे ऑडियो व्हिडीओ व्हायरल झालेलं आहेत.. तसेच गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील तानी एका पत्रकाराला सुद्धा शिवीगाळ केली होती. त्यामुळे शिंदे यांच्या आमदारांना झाला तरी काय, असं प्रश्न पडतोय.