RSS चं बौद्धिक शिबीर, एकनाथ शिंदे यांचं संघावर 'लक्ष' अन् अजित दादा 'दक्ष'

RSS चं बौद्धिक शिबीर, एकनाथ शिंदे यांचं संघावर ‘लक्ष’ अन् अजित दादा ‘दक्ष’

| Updated on: Dec 21, 2023 | 12:04 PM

नागपूरचं अधिवेशन आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बैद्धिक शिबीर आलंच. यावेळी भाजपसह शिंदे गटाचे आमदार या शिबीराला गेले पण अजित पवार गटानं जाणं टाळलं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ मुख्यालयात

मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : नागपूरचं अधिवेशन आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बैद्धिक शिबीर आलंच. यावेळी भाजपसह शिंदे गटाचे आमदार या शिबीराला गेले पण अजित पवार गटानं जाणं टाळलं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ मुख्यालयात आले. मात्र शिंदेंच्या रक्तातच संघाची विचारधारा आहे, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले तर भरत गोगावले यांना हे पटलेलं नाही. दरम्यान, शिंदे गटासह अजित पवार यांच्या आमदारांना संघाच्या बौद्धिक वर्गासाठी निमंत्रण देण्यात आलं. पण अजित पवार गटानं येणं टाळलं. त्यावरून प्रवीण दरेकरांनी बोलण्यातून भाजपची नाराजी स्पष्ट दिसली. दर्शनासाठी विचारधारा गुंडाळावी लागत नाही असा टोला दरेकरांनी लगावला तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो, असं अमोल मिटकरी म्हणाले. बघा नेमकं काय झाले आरोप-प्रत्यारोप?

Published on: Dec 21, 2023 12:04 PM