‘लाडकी बहीण योजना’ बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम..काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची तारीख कालच जाहीर झाली आहे. आज महायुतीने पत्रकार परिषदेत घेऊन गेल्या अडीच वर्षांत घेतलेल्या निर्णयाचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवले. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु झाली आहे. महायुतीने आज पत्रकार परिषद घेत या योजनेला सुरुच ठेवणार असल्याची ग्वाही दिली. विरोधक या योजनेला बंद करण्यासाठी कोर्टात गेले. परंतू कोर्टाने ऐकले नाही. आम्ही मोदी साहेबांना सांगून लाडक्या बहिणींना लखपती करण्याची योजना सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सर्व लाडक्या बहीणींच्या पाठीशी सरकार ठाम आहे. ही योजना गेम चेंजर झाली आहे. हे लोक बंद करायला निघाले होते. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतू लाडकी बहीण योजनेचा जो हात लावले…त्याचा करेक्ट कार्यक्रम लाडक्या बहीणीच करतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केले. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडले आहे. आम्ही प्रचंड कामे केली आहेत. दोन ते अडीच वर्षांत तब्बल 900 निर्णय घेतले आहेत. सर्व संक्षिप्त आकडेवारी दिली आहे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.