राज ठाकरेंचा केवळ महायुतीत सहभागच नाही तर शिवसेनेचीही मिळणार कमान?

राज ठाकरेंचा केवळ महायुतीत सहभागच नाही तर शिवसेनेचीही मिळणार कमान?

| Updated on: Mar 24, 2024 | 10:48 AM

केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वासोबत झालेल्या राज ठाकरे यांच्या चर्चेत केवळ मनसे-भाजप युतीयावर चर्चा झाली नाहीतर राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यामागे मोठी रणनिती असल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपने राज ठाकरेंसमोर ३ पर्याय ठेवल्याचे कळतेय

चार दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांनी दिल्लीत भेट घेतली. यानंतर मुंबईतही राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. मात्र या बैठकीत राज ठाकरेंसमोर मोठा पर्याय ठेवण्यात आला आहे, अशी चर्चा आहे. केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वासोबत झालेल्या राज ठाकरे यांच्या चर्चेत केवळ मनसे-भाजप युतीयावर चर्चा झाली नाहीतर राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यामागे मोठी रणनिती असल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपने राज ठाकरेंसमोर ३ पर्याय ठेवल्याचे कळतेय. त्यातील पहिला पर्याय मनसेचं शिंदेच्या शिवसेनेत विलीनीकरण करून शिवसेनेचे नेतृत्वच राज ठाकरे यांनी करावे. म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हाती दिली. आता हीच शिवसेना राज ठाकरे यांच्याकडे देण्याचा विचार आहे.

Published on: Mar 24, 2024 10:48 AM