एकनाथ शिंदेंनी ट्विटर हँडलवरून शिवसेनेचं नाव हटवलं

एकनाथ शिंदेंनी ट्विटर हँडलवरून शिवसेनेचं नाव हटवलं

| Updated on: Jun 21, 2022 | 3:15 PM

आपल्याच पक्षाविरुद्ध बंड पुकारल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्विट केलं आणि हे ट्विट क्षणार्धात व्हायरल झालं. इतकंच नव्हे तर त्यांनी ट्विटर हँडलवरून शिवसेनेचं नावसुद्धा हटवलं आहे.

आपल्याच पक्षाविरुद्ध बंड पुकारल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्विट केलं आणि हे ट्विट क्षणार्धात व्हायरल झालं. इतकंच नव्हे तर त्यांनी ट्विटर हँडलवरून शिवसेनेचं नावसुद्धा हटवलं आहे. ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. एकीकडे या ट्विटच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असतानाच शिवसेनेने त्यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येह अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Published on: Jun 21, 2022 03:15 PM