Eknath Shinde : सत्तास्थापनेच्या हालचाली दरम्यान दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर स्पष्टच बोलले; ‘गावी जायचं नाही का? असा कोणता नियम…’
सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न करत त्यांनी चांगलंच खडसावल्याचे पाहायला मिळाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही असा कोणता नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो, असे शिंदे म्हणाले.
एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दरेगावला गेल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, शिंदे नाराज असल्याच्या चर्चा वारंवार होताना दिसल्या. यावर बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे. सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न करत त्यांनी चांगलंच खडसावल्याचे पाहायला मिळाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही असा कोणता नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो, असे शिंदे म्हणाले. तर मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेतील. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं. विधानसभा निवडणुका झाल्यात. यासाठी एवढे प्रचार दौरे आणि सभा झाल्यात. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. लोकांच्या मनातील सरकार आलं त्यांच्या मनातील सरकार स्थापन होणार आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची पोहोचपावती जनतेने महायुती सरकारला दिली असल्याचे त्यांनी म्हटले.