संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृतीवरून शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
VIDEO | संजय राऊत यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन, सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होण्याचे कारण काय?
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक संजय राऊत यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात हे आंदोलन होणार आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांच्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना संजय राऊत यांनी आधी थुंकलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या या वर्तनामुळे त्यांच्या अटकेची मागणी शिंदे गटाकडून होतेय. टीकेला ज्या पद्धतीने संजय राऊत उत्तर देताय त्यावरून नवा वाद सुरू झालाय. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत आधी थुंकले नंतर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jun 03, 2023 09:08 AM
Latest Videos