भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! दोन वर्षांनंतर मंत्रिपदाची माळ गळ्यात

भरतशेठ… झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! दोन वर्षांनंतर मंत्रिपदाची माळ गळ्यात

| Updated on: Dec 17, 2024 | 10:48 AM

जवळपास दोन वर्षांपासून भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाची चर्चा होती. केवळ मंत्रिपदच नाहीतर त्यांनी शिवलेल्या कोटची पण चर्चा दोन वर्ष सुरू होती. दोन वर्षांपासून ज्यांनी मंत्रिपदाचा कोट शिवून ठेवला होता ते भरतशेठ अखेर मंत्री झालेत.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले अखेर मंत्री झालेत. जवळपास दोन वर्षांपासून भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाची चर्चा होती. केवळ मंत्रिपदच नाहीतर त्यांनी शिवलेल्या कोटची पण चर्चा दोन वर्ष सुरू होती. दोन वर्षांपासून ज्यांनी मंत्रिपदाचा कोट शिवून ठेवला होता ते भरतशेठ अखेर मंत्री झालेत. याआधीच्या सरकारमध्ये दोन ते तीन वेळा भरत गोगावले मंत्रिपदाचा कोट घालतील यासाठी चर्चेत आलं पण दरवेळी त्यांचं नाव पिछाडीवर पडत होतं. मात्र यंदा अखेर भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. नाराज गोगावले यांना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एसटी महामंडळ देण्यात आलं. २० सप्टेंबर २०२४ रोजी भरत गोगावले यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्याच्या २५ दिवसांनंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. महामंडळ अध्यक्ष म्हणून त्यांना जेमतेम २० दिवस मिळालेत. २० दिवसांच्या महामंडळाच्या बैठकीत ७० हून अधिक मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली. शिवनेरी बसेसमध्ये विमानांच्या धर्तीवर सुंदरी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Dec 17, 2024 10:48 AM