Bharat Gogawale : भरत गोगावले यांचा 'कोट' रेडी, आज घेणार मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?

Bharat Gogawale : भरत गोगावले यांचा ‘कोट’ रेडी, आज घेणार मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?

| Updated on: Dec 15, 2024 | 2:18 PM

महायुतीच्या या शपथविधी सोहळ्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरात सगळे मंत्री दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भरत गोगावले यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधी सोहळा असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महायुतीच्या या शपथविधी सोहळ्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरात सगळे मंत्री दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भरत गोगावले यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आज संध्याकाळी चार वाजता तिनही पक्षांच्या वतीने ज्यांना-ज्यांना बोलवलंय त्यांचा शपथविधी होईल. नागपूरातील राजभवनवर महायुती सरकारच्या शपथविधीची सगळी तयारी झालेली आहे. ज्यांना ज्यांना फोन करून कल्पना दिली ते आज सगळे शपथ घेणार आहेत, अशी माहिती देत असताना मला देखील मंत्रिपदासाठी फोन आल्याचे भरत गोगावले म्हणाले. पुढे भरत गोगावले असेही म्हणाले की, सगळ्या खात्यात इंट्रेस आहे. तसं नसतं. जे आमचे नेते देतील त्यात काम करायचं. यासंदर्भात कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. पहिले मंत्रिपदाची शपथ घेतली जाते मग खाते वाटप केले जाते. जो काम करणारा आहे, त्याला कोणतंही खातं मिळालं तरी तो काम करू शकतो, त्यामुळे असं काही नाही.

Published on: Dec 15, 2024 02:18 PM