Cabinet Expansion 2024 : आमदारकीचा चौकार अन् शिंदेंचा विश्वासू नेता संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्याचं लक्ष लागलेलं असताना आज नागपूरातील राजभवनात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महायुतीमधील एकूण 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 232 जागांवर महायुतीने घवघवीत यश मिळवलं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्याचं लक्ष लागलेलं असताना आज नागपूरातील राजभवनात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महायुतीमधील एकूण 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय शिरसाट यांचा संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ असून सलग चार वेळा आमदार ते राहिलेले आहेत. गेल्या मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी ते इच्छुक होते. पण त्यांना मंत्री पदाने सातत्याने हुलकावणी दिली होती. मात्र आज अखेर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.