Cabinet Expansion | पक्षप्रतोद गेल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपदाची अपेक्षा? काय केलं सूचक वक्तव्य
VIDEO | पक्षप्रतोद गेल्यानंतर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या, काय म्हणाले...
महाड : सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व कृतींचा समाचार न्यायालयाने घेतला. राज्यपालांच्या हस्तक्षेपावर ताशेरे मारत, विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवल्यानंतर, विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवडही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवली. मात्र शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी दिलासा दिला. न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात कायम राहणार आहे. यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. याचदरम्यान भरत गोगावले यांनी मंत्रीपदारून मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महाडमधील नेते आमदार भारत गोगावले यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये खेळी केली. यात त्यांनी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी शिवबंधन हाती बांधलं. मात्र यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येच जुंपली. महाडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. ‘पक्षप्रतोद पद गेलं, आता मंत्रिपद घेऊन येतोच’, असं विधान शिवसेना आमदार भारत गोगावले केलं आहे. यामुळे भरत गोगावले यांना कोणतं पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.