Sanjay Shirsat नेमकं काय म्हणाले, दसरा मेळाव्यास आम्हाला परवानगी मिळाल्यास जर कुणी कोर्टात गेलं तर…
VIDEO | उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट शिवतीर्थावर दसरा मेळावा व्हावा, यावरून आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच नाहीतर शिवाजीपार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही आहेत, अशाताच संजय शिरसाट यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या एकच चर्चा सुरूये, शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा व्हावा, यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट आग्रही असून गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केले आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा ही आमची इच्छा असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्क आम्हाला दसरा मेळाव्यासाठी मिळावे, यासाठी सरकार म्हणून आम्ही कोणावरच दबाव टाकला नाही. आम्हाला परवानगी द्या असं सांगायला आम्हाला कमिशनरला वेळ लागणार नाही, पण आम्हाला परवानगी मिळाल्यास जर कोणी कोर्टात गेलं तर आमची वेळेवर धावपळ नको म्हणून पर्यायी २ ते ३ जागा पाहिल्याते त्यांनी म्हटले तर ठाकरे गटाने दसरा मेळावा घेतला नाही. तरी त्यांना काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांना खोचक टोलाही लगावला आहे.