शिंदे अन् ठाकरेंचे आमदार, दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ

शिंदे अन् ठाकरेंचे आमदार, दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ

| Updated on: Dec 16, 2024 | 4:07 PM

महायुतीला निवडणुकीत मोठं संख्याबळ मिळालं असल्याने सत्ताधाऱ्यांच्या बाकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसल्याचे पाहायला मिळाले. तर विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली

नागपूर येथे आजपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज सोमवारपासून ते शनिवारी (२१ डिसेंबर) या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. महायुतीला निवडणुकीत मोठं संख्याबळ मिळालं असल्याने सत्ताधाऱ्यांच्या बाकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसल्याचे पाहायला मिळाले. तर विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले सर्व नवनिर्वाचित आमदार नागपुरात दाखल झाले आहेत. अशातच विधानभवन परिसरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. कैलास पाटील आमच्या पक्षात येऊ लागले, असं संतोष बांगर यांनी केलेल्या वक्तव्यावर कैलास पाटील यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. यावेळी मजा-मस्करी करत संतोष बांगर आणि कैलास पाटील यांनी एकमेकांचे कान धरले, टाळ्या दिल्या, हस्त आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 16, 2024 04:07 PM