'आजीच्या पुढे माजी लागायला नको', मनसे आमदार राजू पाटील यांना कुणाचा अप्रत्यक्ष टोला

‘आजीच्या पुढे माजी लागायला नको’, मनसे आमदार राजू पाटील यांना कुणाचा अप्रत्यक्ष टोला

| Updated on: Oct 03, 2023 | 10:50 PM

VIDEO | 'मुंगेरीलाल के हसीन सपने स्वप्न हे बघितलं पाहिजे. मात्र हे ही स्वप्न बघा की आजीच्या पुढे माझी लागता का म्हणे याचीही दक्षता घ्या', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना लगावला टोला

ठाणे, ३ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे चांगले मुख्यमंत्री राज्याला लाभलेले आहेत. मात्र काही लोकांना रोज टिका टिप्पणी आणि खालच्या स्तरावर जाऊन भाषा करायचं टीका करायचा ही सवय आहे. ही सवय इथे पण आहे. पाच वर्षे लोकांनी जबाबदारी दिली मात्र पाच वर्षात अजून काही कमावलं नाही. पाच वर्ष जबाबदारी दिल्यानंतर आता अजून मोठी स्वप्न पडायला लागली. मात्र स्वप्न बघायला हरकत नाही. मुंगेरीलाल के हसीन सपने स्वप्न हे बघितलं पाहिजे. मात्र हे ही स्वप्न बघा की आजीच्या पुढे माजी लागता कामा नये याचीही दक्षता घ्या, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना टोला लगावला आहे तर राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चांना माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे, असे म्हणत भावी मुख्यमंत्री म्हणून स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना श्रीकांत शिंदे यांनी खोचक टोला लगावला आहे.

Published on: Oct 03, 2023 10:47 PM