देवेंद्र फडणवीसांच्या नावावर CM म्हणून शिक्कामोर्तब, पण 'भाजप सरप्राईज देईल?', संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं खळबळ

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर CM म्हणून शिक्कामोर्तब, पण ‘भाजप सरप्राईज देईल?’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं खळबळ

| Updated on: Dec 03, 2024 | 11:42 AM

देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे पण शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भाजप सरप्राईज देईल का? असं म्हणत भाजपच्याच गोटात खळबळ उडवून दिली आहे.

येत्या गुरूवारी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे पण शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भाजप सरप्राईज देईल का? असं म्हणत भाजपच्याच गोटात खळबळ उडवून दिली आहे. सत्तास्थापनेची पाच तारीख आणि संध्याकाळी पाच वाजताची वेळ ठरली. भाजपकडून नेता निवडीसाठी निर्मला सीतारमन आणि विजय रूपानी या दोघांची निरीक्षक म्हणून निवडही झाली. पण संजय शिरसाट यांनी सरप्राईज हा शब्द प्रयोग करत खळबळ उडवून दिली. सरप्राईज देणं हा भाजपचा गुणधर्म आहे आणि सरप्राईज दिलं तरी शिवसेनेला आश्चर्य वाटणार नाही. अर्थात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झालं असताना शिरसाट यांनी सरप्राईज वरून शंका उपस्थित केली आहे. तर चेहरा निश्चित आहे, सांगायची गरज नाही असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर म्हटलंय. मात्र गेल्या दोन-तीन दिवसात शिरसाट यांनी जी काही वक्तव्य केलीत त्यावरून महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताय की काय? असा सवाल आहे. कारण विरोधकांची भाषा शिरसाट यांच्या तोंडी दिसत आहे.

Published on: Dec 03, 2024 11:42 AM