अफजलखानाची कबर फोडून दाखवली आणि आज..., 'मातोश्री'समोर ठाकरे यांना डिचवणारी बॅनरबाजी

“अफजलखानाची कबर फोडून दाखवली आणि आज…”, ‘मातोश्री’समोर ठाकरे यांना डिचवणारी बॅनरबाजी

| Updated on: Feb 25, 2023 | 7:52 PM

VIDEO | मातोश्रीसमोर पोस्टरबाजी करून उद्धव ठाकरे यांना जोरदार लगावला टोला, बघा व्हिडीओ

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नामांतर करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद या शहराचे धाराशिव नामाकरण करण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार आनंदोत्सव साजरा केला आहे. अशातच मातोश्रीसमोर करून दाखवलं.. अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेनेच्या नेत्यांनी नामांतरावरून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. अफजलखानाची कबर फोडून दाखवली, प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा करून दाखवला, गडकिल्यांसाठी महामंडळ स्थापन करून दाखवलं अशी पोस्टरबाजी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणकोणते निर्णय घेतले आणि ते घेऊन दाखवले याचा टोला लगावणारे बॅनर्स उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Feb 25, 2023 07:52 PM