Kalyan : कल्याणमध्ये पुन्हा शिंदे गटानं भाजपला डिवचलं? शिवसेना माजी नगरसेवकाच्या 'त्या' बॅनरची चर्चा

Kalyan : कल्याणमध्ये पुन्हा शिंदे गटानं भाजपला डिवचलं? शिवसेना माजी नगरसेवकाच्या ‘त्या’ बॅनरची चर्चा

| Updated on: Oct 06, 2023 | 10:41 PM

VIDEO | कल्याणमध्ये पुन्हा शिंदे गटाकडून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भावी आमदार उल्लेख असलेली बॅनरबाजी केली असल्याचे पाहायला मिळत आहे

कल्याण, ६ ऑक्टोबर २०२३ | कल्याणमध्ये पुन्हा शिंदे गटाकडून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांचे भावी आमदार उल्लेख असलेले बॅनर लावल्याचे पाहायला मिळत आहे. महेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर कल्याण शहरात लावण्यात आले आहेत. आधीच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना नगरसेवक आणि भाजप आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्यातील वाद-विवाद संपत नाही. अनेकदा या दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि उघडपणे टीका केली जाते. त्यातच आता शिवसेना माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चहात्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी त्यांचे भावी आमदार असलेला बॅनर शहरांमध्ये लावल्याने त्या बॅनरच्या माध्यमातून कल्याण पूर्वचे विद्यमान आमदार गणपतशेठ गायकवाड यांना डिवचण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.

Published on: Oct 06, 2023 10:41 PM