Uddhav Thackeray यांची प्रेस कॉन्फरन्स ही फ्रस्ट्रेशन कॉन्फरन्स, शिवसेनेच्या नेताचा घणाघात

Uddhav Thackeray यांची प्रेस कॉन्फरन्स ही फ्रस्ट्रेशन कॉन्फरन्स, शिवसेनेच्या नेताचा घणाघात

| Updated on: Oct 06, 2023 | 10:22 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते संजय शिरसाट यांची सडकून टीका, 'भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी काही सांगू नये. आपण काय करत होता आपले सहकारी काय करत होते हे आख्या महाराष्ट्राने पाहिलंय', असेही ते म्हणाले.

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदेडसह राज्यातील शासकीय रूग्णालयातील रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते संजय शिरसाट यांनी सडकून टीका केली. संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स ही फ्रस्ट्रेशन कॉन्फरन्स होती, अशी खोचक टीका त्यांनी केली. तर भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी काही सांगू नये. आपण काय करत होता आपले सहकारी काय करत होते हे आख्या महाराष्ट्राने पाहिलंय, असेही म्हणत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Oct 06, 2023 10:22 PM