Cabinet Expansion : तानाजी सावंतांचा पत्ता कट? अवघ्या काही मिनिटांवर शपथविधी अन् 3 बडे नेते वेटिंगवर, मंत्रिपदासाठी फोनच नाही

Cabinet Expansion : तानाजी सावंतांचा पत्ता कट? अवघ्या काही मिनिटांवर शपथविधी अन् 3 बडे नेते वेटिंगवर, मंत्रिपदासाठी फोनच नाही

| Updated on: Dec 15, 2024 | 3:22 PM

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे साऱ्याचे लक्ष लागलेलं असताना अखेर आज नागपूरात चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात २८८ पैकी २३२ जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला. विधानसभेच्या निकालानंतर १० दिवस उलटून गेल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे साऱ्याचे लक्ष लागलेलं असताना अखेर आज नागपूरात चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत महायुतीमधील एकूण ३९ आमदारांना फोन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. ज्यामध्ये भाजप २०, शिवसेना शिंदे गट १० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव या यादीत नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शपथविधी सोहळ्याला अवघे काही मिनिटं शिल्लक असतानाही अद्याप शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही त्यामुळे अद्याप वेटिंग लिस्टवर असल्याने त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

Published on: Dec 15, 2024 03:22 PM