‘बाळासाहेब ठाकरे नसते तर…’, शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारानं भाजपची काढली औकात
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली, शिवसेनेच्या कालच्या जाहिरातीवर भाजपने नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच साधला निशाणा
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या जाहिरातीवरून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर शिंदे गटाने भाजपची औकातच काढली आहे. या जाहिरातीवरून भाजपने नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही भाजपला जसेच्या तसे उत्तर दिलं आहे. भाजपकडून शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करण्यात येत आहे. त्यावरूनही संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करतेय. शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे थांबवा. तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचाही विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर आपली काय औकात होते हे लक्षात ठेवले पाहिजे, असं म्हणत अनिल बोंडे यांनी बोलताना आत्मचिंतन करून बोलावं, असा सल्लाही संजय गायकवाड यांनी दिला.