'कामाने उत्तर द्या; शिव्या, शाप किंवा थुंकून नाही', शिवसेनेच्या नेत्यानं संजय राऊत यांना फटकारलं

‘कामाने उत्तर द्या; शिव्या, शाप किंवा थुंकून नाही’, शिवसेनेच्या नेत्यानं संजय राऊत यांना फटकारलं

| Updated on: Jun 04, 2023 | 7:30 AM

VIDEO | महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचे काम सुरू, शिवसेना नेत्याचं संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिनसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या त्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, ज्या प्रमाणे मला वाटतं जसं सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे आणि एक वेगळी संस्कृती आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण गढूळ झाले आहे. जिथे विरोधकदेखील एकमेकांचे नाव आदराने घेत असतात. मात्र आज त्या सगळ्या पातळ्या सोडून दिल्या जात असल्याची टीकाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. विरोधक सकाळपासूनच शिव्या शाप देण्याचे काम सुरू करतात ते रात्रीपर्यंत त्यांची टीका करणे सुरूच असतं. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती ही दूषित करण्याचे हे काम केले जाते आहे, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तर कामाचे उत्तर कामाने दिले पाहिजे शिव्या शाप किंवा थुंकून या सगळ्या गोष्टी होणार नाहीत असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Published on: Jun 04, 2023 07:30 AM