‘एकनाथ शिंदे यांना आम्ही सोबत आणलं नाही तर…’, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय केलं मोठं वक्तव्य?
VIDEO | २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर २०२४ नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काय केलं सूचक विधान?
अमरावती, २५ ऑगस्ट २०२३ | ‘एकनाथ शिंदे यांना आम्ही सोबत आणलं नाही तर एकनाथ शिंदे हे हिंदुत्वासाठी आमच्यासोबत आलेत’, असे भाजपचे बडे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, “२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत असं आमच्या नेतृत्वानं स्पष्ट केलं आहे आणि मीही स्पष्ट केलंय. २०२४ नंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांनी जर भावना व्यक्त केली तर त्यात गैर काय? ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असतेच. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, भाजपच्या लोकांना वाटत असेल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे आणि त्याला असं का वाटू नये?” असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. तर २०२४ नंतर मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय गणितांवर अधारित निर्णय घेतले जाणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.