Sushma Andhare : एकनाथ शिंदे यांची सन्मानपूर्वक एक्झिट होणार? देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅन बीवरून सुषमा अंधारे यांचा निशाणा
VIDEO | एकनाथ शिंदे यांना अत्यंत सन्मानपूर्वक एक्झिट देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी केलं कबुल? देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅन बीवरून सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून चाणाक्यनिती नाहीतर त्यांची कपटनीती होती ती फसली आहे.
पुणे, २९ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री शिंदेंच्या अपात्रतेवरुनही फडणवीसांनी TV9च्या मुलाखतीत मोठा खुलासा केला. एकनाथ शिंदे अपात्र होणारच नाहीत. पण अपात्र झाले तरी विधान परिषदेवरुन येऊन तेच मुख्यमंत्री होतील असा प्लॅन बीच देवेंद्र फडणवीसांनी tv9च्या मुलाखतीत उघड केला. यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना अत्यंत सन्मानपूर्वक एक्झिट देण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी कबुल केलं आहे. बाकी अपात्रतेची कारवाई काय होणार हे तेव्हाच कळेल. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या यासर्व वक्तव्यातून चाणाक्यनिती नाहीतर देवेंद्र फडणवीस यांची कपटनीती होती ती फसली आहे. तर दोन पक्ष फोडून देखील मुख्यमंत्री पद का मिळवता आलं नाही, याचं उत्तर जर टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत दिलं असतं तर ते जास्त योग्य ठरलं असतं, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टोलाही लगावला आहे.