‘एकनाथ शिंदे आमदारांच्या विनंतीला नकार देणार नाहीत’, काय म्हणाले संजय शिरसाट
महाराष्ट्रात एकीकडे नव्या सरकारच्या शपथ विधी सोहळ्याची तयारी सुरु असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याचा सस्पेन्स कायम आहे. या संदर्भात शिंदे यांचे आमदार संजय शिरसाट यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
एकीकडे प्रचंड बुहमत मिळालेल्या महायुतीच्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार की नाही यावर संशयाचं मळभ आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांना आम्ही सर्व आमदारांनी विनंती केली आहे. त्यामुळे ते नक्कीच शपथ घेतील असे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंत, संजय शिरसाट, भरत गोगावले असे सर्व आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी वर्षावर धाव घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सायंकाळी आझाद मैदानात शपथ घेतील असे म्हटले जात आहे. सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहात भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शाह यांची देखील बैठक आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं

Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
